Breaking News

ओवे कॅम्प गावठाणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आश्वासन

पनवेल : रामप्रहर वृत्त

ओवे कॅम्प (कोयना प्रकल्पग्रस्त) ग्रामस्थांचा प्रलंबित असलेला गावठाणाचा प्रश्न संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) ग्रामस्थांच्या बैठकीत दिले.

ओवे कॅम्प ग्रामस्थांचा 15 एकर 20 गुंठे जमीन असलेल्या गावठाणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भात सोमवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गावात बैठक झाली. या बैठकीस भाजपचे पनवेल तालुका प्रमुख संघटक प्रभाकर जोशी, युवा नेते मयुरेश खिस्मतराव, ज्येष्ठ नेते कृष्णा केसरकर, ओवे शहर उपाध्यक्ष रामचंद्र जाधव, संतोष रेवणे, सुनील रेवणे, सदानंद भातोसे, श्रीरंग केसरकर, श्रीरंग जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

ओवे कॅम्प ग्रामस्थांचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले. या संदर्भात दोन दिवसांत म्हणजेच येत्या गुरुवारी प्रांत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तेथे संबंधित जमिनीचा सातबारा खातेदारांच्या नावे करण्याच्या दृष्टीने प्रांताधिकार्‍यांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply