Breaking News

किंजळोली गावात दोन गटात हाणामारी

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील किंजळोली गावात किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी होण्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यामध्ये दोन्ही गटातील सातजण जखमी झाले आहेत. या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

किंजळोली गावात यापूर्वी झालेला दोन गटातील वाद मिटवण्यात आला होता. मात्र गुरुवारी पुन्हा वाद झाला आणि याचे रूपातंर हाणामारीत झाले. यामध्ये एका गटातील लता सुभाष रिंगे, विकी सुभाष रिंगे, सनी सुभाष रिंगे, निखील नामदेव रिंगे, स्वप्नाली निखील रिंगे हे पाच जण आणि दुसर्‍या गटातील स्नेहल जितेंद्र चव्हाण, विद्या विठ्ठल शेलार असे सात जण जखमी झाले आहेत. लता सुभाष रिंगे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरुन आकाश नथुराम कदम, सनी कदम, दिपेश शेलार, वंदना कदम, विद्या विठ्ठल शेलार, संजना विठ्ठल शेलार, या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर स्नेहल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लता रिंगे, सनी रिंगे, विकी रिंगे, सीमा सनी रिंगे, निखील नामदेव रिंगे, पूजा रिंगे, राजश्री राजू रिंगे, नामदेव लक्ष्मण रिंगे, चंद्रकांत रिंगे, प्रदीप रिंगे (सर्व रा. किंजळोली) या दहा जणांविरोधात भादंवि कलम 143, 147, 149, 354, 324, 323, 427, 504 अन्वये गुन्हा नोंद केला असल्याचे महाड शहर पोलिसांनी सांगितले. यापैकी आकाश कदम, सनी कदम, दिपेश शेलार या तिघांना अटक करण्यात आली आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply