Breaking News

नूतन शाळा इमारतीचे कामोठ्यात भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी शाळा सुरू होणार आहे. या शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) करण्यात आले.

या सोहळ्यास विद्यालयाचे चेअरमन स्वामी म्हात्रे, व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, माजी चेअरमन बाळाराम चिपळेकर, विठ्ठलशेठ गोवारी, नगरसेवक विजय चिपळेकर, के. के. म्हात्रे, सुरदास गोवारी, रमेश म्हात्रे, संतोष म्हात्रे, संतोष पाटील, किशोर गोवारी, सुरेश म्हात्रे, रवी गोवारी, अ‍ॅड. मदन गोवारी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply