Breaking News

सेवानिवृत्त शशिकांत निकाळजे यांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर

पनवेल एसटी स्थानकातील वाहतूक नियंत्रक बाबुराव निकाळजे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांनी सत्कार केला.पनवेलसह इतर ठिकाणी सेवा बजावित असताना ते प्रवाशांशी अत्यंत अदबीने वागत होते. नोकरीसह विविध सामाजिक क्षेत्रातसुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यांनी गेली 34 वर्षे एसटी महामंडळाला सेवा दिली आहे. या त्यांच्या सेवेबद्दल रामेश्वर आदिवासी सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा विशेष सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply