
पनवेल ः वार्ताहर
बौद्धजन पंचायत समिती शाखा 801 व कामोठ येथील संघर्ष युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामोठे सेक्टर 16 जयभीम स्तंभ येथे कँडल मार्च चे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी युवक अध्यक्ष आशिष कदम, रमेश गमरे, विनोद गमरे, अरुण जाधव, आत्माराम कदम, धर्मदास जाधव, मंगेश बल्लाळ, तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

पनवेल ः वार्ताहर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतभूषण, विश्वरत्न महामानव बौध्दीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनी करंजाडे येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी करंजाडे येथील पोलीस पाटील कुणाल लोंढे, प्रबुध्द सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विक्रम मोरे, उपाध्यक्ष वंदना खंडारे, सचिव बापूसो साबळे, सल्लागार बाळासाहेब वाघमारे, कमलाकर कांबळे गुरुजी, रोहन खेडेकर, अनिकेत लोंढे, अमित कांबळे, जेष्ठ नागरिक व संस्थेचे सदस्य व धम्मबांधव उपस्थित होते.

उरण ः वार्ताहर
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.843 व माता रमाई महिलामंडळ बौध्दवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महामानवास अभिवादन कार्यक्रम झाला.
या वेळी आमदार महेश बालदी, भाजपा तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेविका जानव्ही पंडीत, नगरसेविका, स्नेहल कासारे, बांधकाम अभियंता झुंबर माने, नगर अभियंता अनुपकुमार कांबळे, नगरसेवक नंदु लांबे, नगरसेवक राजेश ठाकूर, सागर मोहिते, सविन म्हात्रे, मनन पटेल, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.843 चे अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष हरेश जाधव, सेक्रेटरी विजय पवार, रोशन गाडे, आनंद जाधव, सुरेश गायकवाड, विनोद कांबळे, संजय पवार, विलास मोहिते, विकास कांबळे, दिपक पाटील, शुधोघन जाधव, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता सकपाळे, संगिता जाधव, सविता साळवी, करुणा भिंगावडे, पुष्पा कांबळे, गिता कांबळे, चिंतामण गायकवाड व अन्य पक्षातील प्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच गुरुवारी (दि. 5 )रोजी शहरात रात्री भिमज्योत काढण्यात आली होती. शेवटी रात्री 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे बुद्धवंदना घेण्यात आली.

मोहोपाडा ः वार्ताहर
रसायनीतील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त दांडफाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील दांडफाटा येथे ध्वजवंदन करुन डॉ.बाबासाहेबांना रसायनी व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून, मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले. तसेच ध्वज वंदनाचा कार्यक्रम झाला. अॅडव्होकेट डि.टी.दांडगे यांनी महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
यावेळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन दादर चैत्यभूमी येथे निघालेल्या आंबेडकरी अनुयायांसाठी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते नाश्त्याची व थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो अनुयायांनी या नाश्त्याचा आस्वाद घेतला.
दादर चैत्यभूमी येथे निघालेल्या नागरिकांना सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी दरवर्षी सम्यक सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत असतात.

नवी मुंबई : वार्ताहर
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरवणे येथील शाळा क्रमांक 15 व शाळा क्रमांक 101 या शाळेत शुक्रवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन झाला. मुख्याध्यापक सुनिल मुकादम व मंगल भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सुनिल मुकादम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य, समता व विश्वबंधुता या मूल्यांची जपणूक करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
ज्योती शिंदे, रिद्धी मोहिते, अमन अन्सारी, सोहम कदम, कोमल गायकवाड या विद्यार्थी वक्त्यांनी आपल्या बहारदार भाषणांनी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखविला तर श्वेता चाळके या विद्यार्थिनीने चवदार तळ्याचं पाणी हे गीत गावून उपस्थितांची मने जिंकली. कला शिक्षक अमृत पाटील नेरुळकर यांनी पिकली ज्ञानाची दौलत, मनं मेलेल्या वस्तीत, बॅरिस्टरी, थांबा थांबा जाळता का आदी गीते सादर करुन महामानवास आगळी वेगळी संगीतमय आदरांजली अर्पण करुन उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.