Breaking News

पाली देवदमध्ये दफनभूमीच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यात भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध कामे सातत्याने होत असतात. अशाच प्रकारे पाली देवद येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून दफनभूमीचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पाली देवद ग्रामपंचायतीचे उपसरपंच आलुराम केणी, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, योगेश पाटील, बुवाशेठ भगत, चंद्रकांत पोपेटा, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हनुमान खुटले, संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply