Breaking News

विश्वज्योत हायस्कूलमध्ये सूरव्यापी स्पर्धा

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

खारघर येथील विश्वज्योत हायस्कूलमध्ये 6वी वार्षिक सूर व्यापी अंतिम फेरी स्पर्धा शनिवारी (दि. 7) घेण्यात आली. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले.

स्पर्धेत गट-ए (8ते11वर्ष) मध्ये तीर्थ निर्णय हांडे याचा  प्रथम क्रमांक, गट-बी(12ते14वर्ष) मध्ये मध्यमा विक्रम परळीकर हीला द्वितीय क्रमांक, गट-सी (15 ते 18 वर्ष)मध्ये खुशी किरीट पटेल हीचा तृतीय  क्रमांक इतर शिक्षक गट-डीमध्ये शरथ निळकंठ  मुळीक यांचा

प्रथम क्रमांक आला आहे.

वरील विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या संगीत  शिक्षकांचे, संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज  अलोनी मॅडम यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply