माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राची शौर्य परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी पनवेल शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांची पाहणी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली. या वेळी त्यांनी कट्टा परिवार, यशोपुरम वसंत सोसायटी आणि बल्लाळेश्वर मंदिर परिसरात स्पर्धकांनी उभारलेल्या किल्ल्यांची विशेष पाहणी करून त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले. या किल्ल्यांच्या बांधणीतून स्पर्धकांनी दाखवलेल्या कल्पकतेला आणि इतिहासाच्या अभ्यासाला त्यांनी दाद दिली.या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 50 हजार रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात प्रथम क्रमांकास 10 हजार, द्वितीय क्रमांकास 7 हजार, तृतीय क्रमांकास 5 हजार तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे मधून प्रत्येकी हजार तर स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांना भाजयुमोतर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या पाहणी दौर्यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, युवा मोर्चा शहर अध्यक्ष हिमेश बहिरा, तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी देवांशु प्रभाळे, अनिमेश ओझे, अभिषेक पटवर्धन, हर्षल भास्कर, कोमल कोळी, शुभम कांबळे आदी उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper