Breaking News

रूचिता लोंढे यांची प्रचारात आघाडी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्ष, आरपीआय मित्र पक्ष युतीच्या उमेदवार रुचिता लोंढे यांनी आघाडी घेतली आहे. जोरदार घोषणा देत रविवारी (दि. 29) लोंढे यांचा प्रचार करण्यात आला. या वेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांची कन्या रुचिता लोंढे यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळ रविवारी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी कोळीवाड्यात वाढविण्यात आला.
कै. मुग्धा लोंढे यांचे कार्य पुढे नेण्यासाठी रूचिता लोंढे या आईच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यरत आहेत. त्यामुळे 9 जानेवारी 2020 रोजी होणार्‍या पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी भाजप, आरपीआय मित्रपक्ष युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांच्या कमळ निशाणीसमोरील बटण दाबून त्यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन भाजप युतीच्या कार्यकर्ते मतदारांना करीत आहेत.
पनवेल शहरातील सावरकर चौक परिसरात रविवारी प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदू पटर्वधन, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, उमेदवार रूचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply