Breaking News

जांभूळपाडा अंगणवाडी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

सुधागड ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गावामध्ये असलेल्या अंगणवाडीची इमारत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जांभूळपाडा येथील अंगणवाडी बांधून 36 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे इमारत मोडकळीला आली आहे. पावसाळ्याच्या दिवासात तर अनेक ठिकाणी पाणीगळती होते.

काही ठिकाणी भिंती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे  अंगणवाडीसेविका आणि मदतनीसांना मुलांसाठी आणलेला पोषण आहार सांभाळून ठेवावा लागत आहे, तसेच या अंगणवाडी इमारतीच्या भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे या अंगणवाडीत शिकणार्‍या मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, या अंगणवाडी कामाचे प्रस्ताव आजपर्यंत चार वेळा देण्यात आले, मात्र दिलेल्या प्रस्तावाची अद्याप दखल घेण्यात आली नाही. आपल्या मुलांना जीव धोक्यात घालून अंगणवाडीत पाठविण्यासाठी कोणीही पालक तयार होत नाहीत. अंगणवाडी दुरुस्तीबाबत प्रशासनाने तत्काळ  दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply