Breaking News

लाराला भारतीय खेळाडूंवर विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये आयसीसीची प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे, असे वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा याने सांगितले. तसंच त्यानं कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावांचा (400) विक्रम मोडू शकणार्‍या तीन फलंदाजांची नावंही सांगितली. यात दोन भारतीय फलंदाज आहेत. ब्रायन लारा यानं सध्याच्या भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो. या संघात आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे, असं लारा म्हणाला. लाराच्या नावावर कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे. त्यानं 2004मध्ये इंग्लंडविरुद्ध 400 धावांची खेळी केली होती. हा विक्रम अद्याप कुणी मोडलेला नाही. मात्र, हा विक्रम मोडू शकणार्‍या तीन फलंदाजांची नावं खुद्द लारानं सांगितली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply