Wednesday , February 8 2023
Breaking News

‘चला हवा आली कामोठ्यात’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या बॅनरचे उद्घाटन

कामोठे : रामप्रहर वृत्त

कैलासवासी बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय झेंडा सामाजिक संस्थेच्या वतीने 16 फेब्रुवारीला चला हवा आली कामोठ्यात या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 11) करण्यात आले.

कैलासवासी बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय झेंडा सामाजिक संस्था कामोठे यांच्यावतीने चला हवा आली कामोठ्यात या तीन तासांच्या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन खांदा कॉलनीमधील सर्कस ग्राउंडवर सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे.

उद्घाटना वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह भाजपचे जिल्हा प्रवक्ते वा. टी. देशमुख, उद्योजक राजु गुप्ते, कैलासवासी बळीराम राघो पावणेकर,  सार्वजनिक वाचनालय आणि झेंडा सामाजिक संस्था कामोठेचे संस्थापक अशोक पावणेकर, अध्यक्ष अ‍ॅड. जय पावणेकर, जगदिश पावणेकर, विशाल पावणेकर आदी उपस्थित होते. या आयोजित ंकार्यक्रमासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply