पणजी : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिजमध्ये चार एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके आणि गेल्या दोन वर्षांत ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये तीन शतके झळकाविणारा अजिंक्य राहणे भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघात नाही, परंतु त्याला विश्वचषक संघात स्थान मिळविण्याचा विश्वास आहे. अजिंक्यने मुश्ताक अली क्रिकेट चषक स्पर्धेदरम्यान इंदूर येथे आपली मते व्यक्त केली.
रहाणे म्हणाला, माझी निवड करणे किंवा न करणे हे निवडकर्त्यांचे काम आहे. जेव्हा कधी मला राष्ट्रीय संघात संधी मिळते, तेव्हा पूर्ण ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतो. मी पुढचा विचार करतो. मला विश्वास आहे की मी विश्वचषक संघात असेन.