Thursday , March 23 2023
Breaking News

टीम इंडियाकडून जवानांप्रति बांधिलकी

रांची : वृत्तसंस्था

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसर्‍या सामन्यामध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. संघातील सर्व खेळाडू आर्मी कॅप घालून सामना खेळले. याशिवाय सामन्यातून मिळणारी रक्कमदेखील राष्ट्रीय संरक्षण निधीला भेट दिली.

सामना सुरू होण्याआधी सेनेची मानद लेफ्टनंट कर्नल ही रँक असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आर्मी कॅपचे खेळाडूंना वाटप केले. यानंतर कर्णधार विराट कोहली नाणेफेकीला आला. त्या वेळी त्याच्या या कॅपवर बीसीसीआयचा लोगो होता. खेळाडूंनी सर्व उपस्थितांनादेखील राष्ट्रीय संरक्षण निधीला योगदान देण्याचे आवाहन केले.

वन डेत खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूला आठ लाख आणि राखीव खेळाडूला प्रत्येकी चार लाख रुपये मिळतात. भारतीयांनी शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि नातेवाइकांसाठी मदत निधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात देणगी द्यावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

Check Also

आदिवासी रायगड प्रीमियर लीग रंगणार

कळंबोली : बातमीदार रायगडच्या विविध भागांत क्रिकेटचा फिवर वाढला आहे. जिल्ह्यात एकीकडे मोठ-मोठ्या स्पर्धा भरविल्या …

Leave a Reply