Monday , February 6 2023

खालापुरात संशयास्पद कार

अपघातानंतर तिघे जण फरार

खोपोली : प्रतिनिधी

खालापुरात आठवडाभरापूर्वी अपघात झालेली कार संशयास्पद अवस्थेत पडून आहे. अपघातानंतर कारमधील तीन जणांनी जखमी अवस्थेत पळ काढल्याने या कारचे गूढ वाढले आहे. खालापूर शहरातून द्रुतगती मार्गाला जोडरस्ता असून आठवड्यापूर्वी पहाटेच्या वेळेस सुसाट वेगाने जाणारी कार जोगावडे वाड्यानजीक वळणावर रस्ता सोडून शेतात पलटी झाली. कारमधील तिघे जण जखमी अवस्थेत कार सोडून पसार केले. खालापूर पोलिसांनी कारचा पंचनामा केला. आठवड्यानंतरही कार अपघात ठिकाणी पडून असून गाडीत ब्रेडची पाकिटे आणि नायलॉन रस्सी सापडली आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply