Breaking News

अवैध गौणखनिज उत्खननामुळे मांडला गावाला धोका

प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात

मुरूड : प्रतिनिधी

गेल्या अनेक महिन्यांपासून मुरूड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरावर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केले जात असून याकडे स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याबद्दल ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे. गावाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे समजते. मांडला ग्रामपंचायत हद्दीतील गटनंबर 188/2अ मध्ये (क्षेत्र 56.65.00 व 49.95.00) त्याचप्रमाणे मौजे पारगाण गट क्रमांक 36 मध्ये सुमारे सहाशे एकर वनक्षेत्रामध्ये अनधिकृतपणे 10 ते 15 पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने रात्रंदिवस गौण खनिज उत्खनन सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांनी मुरूड तहसीलदारांना  निवेदन दिले असल्याचे मुरूड तालुका चर्मकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश नांदगावकर व रोहिदास उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर महाडिक यांनी सांगितले.

 

अवैध गौणखनिज उत्खनना मुळे मांडला गावाला  धोका निर्माण झाला असून, संबंधित अधिकार्‍यांनी  वेळीच उपाययोजना करावी. अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.

-सुरेश नांदगावकर, ग्रामस्थ, मांडला, ता. मुरूड

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply