Breaking News

पनवेल बसपोर्टची प्रतीक्षा लवकरच संपणार

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु ठेकेदार नेमून अनेक वर्षे उलटली तरी पनवेल बसपोर्टचा प्रकल्प तांत्रिक अडचणीत अडकल्याचे समोर आले आहे. या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर या बसपोर्टची निर्मिती व्हावी आणि प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे या बसपोर्टच्या उभारणीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणाचे काम इडूस पार्क इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीला डिसेंबर 2018मध्ये देण्यात आले असतानाही संबंधित ठेकेदाराने बस आगाराच्या आराखड्यात त्रुटी आढळल्यामुळे अद्याप काम सुरू केले नाही. त्या अनुषंगाने सुधारित आराखडा मंजुरीकरिता राज्य शासनाकडे सादर केला आहे. असे असतानाही बस आगाराचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या बस आगाराच्या नूतनीकरणाच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात दाखल केला होता.
यावर राज्याचे परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले की, पनवेलमध्ये आधुनिक बसतळासह (बसपोर्ट) व्यापारी संकुल बांधणे या प्रकल्पांतर्गत पनवेल येथे आगार, बसस्थानक, इतर आस्थापने, सदनिका, वाणिज्य आस्थापने यांचा समावेश आहे.
या प्रकल्पासाठी मे. इडूस पार्क इंटरनॅशनल प्रा. लि. यांची विकसक म्हणून निवड करण्यात आली आहे. या विकासकाद्वारे प्रकल्पाचे आराखडे पनवेल महानगरपालिकेस मंजुरीकरिता सादर करण्यात आले असता महापालिकेच्या नियमावलीनुसार त्यात काही बदल सुचविण्यात आले व त्यानुसार बदल करून नकाशे पुन्हा सादर करण्यात आले आहेत, तसेच प्रकल्पाचा विकासकरार करण्यासाठी विकास कराराच्या नस्तीस महामंडळाद्वारे मंजुरी देण्यात आली असून, ही नस्ती विकसकाने अलिबाग येथील नोंदणी कार्यालयात सादर केली असता त्यावर नोंदणी शुल्क पाच टक्के लावण्याबाबत नोंदणी कार्यालयाने सूचित केले आहे. सद्यस्थितीत प्रवाशांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरूपाच्या बसस्थानकाचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. पनवेल येथील पूर्वीच्या बसस्थानकातून वाहतूक सुरळीत सुरू आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply