Friday , September 29 2023
Breaking News

ऋतुराजचा अफलातून झेल

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र संघाने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग गटात अव्वल स्थान पटकावताना अंतिम फेरीत प्रवेश केला. लीगच्या शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राने रेल्वेवर 21 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने सीमारेषेवर अफलातून झेल टिपला. हा झेप पाहून पंचही चक्रावले. ऋतुराजच्या या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रेल्वेकडून डावाच्या अखेरच्या चेंडूंवर मनजीत सिंगने साईटस्क्रीनच्या दिशेने खणखणीत फटका मारला. हा चेंडू सीमारेषा पार करेल असे सर्वांना वाटले होते, परंतु ऋतुराजने अप्रतिम कौशल्य दाखवत तो चेंडू हवेतच टिपला आणि सीमारेषेच्या आत भिरकावला. त्या वेळी जवळच उभ्या असलेल्या दिव्यांग हिमगणेकरने तो चेंडू टिपून रेल्वेचा डाव गुंडाळला.

Check Also

वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना

मुंबई : प्रतिनिधी यंदा भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणार्‍या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (दि. …

Leave a Reply