उरण : वार्ताहर
कोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात वेगाने पसरत आहे.त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी उरण पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांसाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवार (दि. 23) पासून आस्थापना सुरु ठेवण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. 1) सकाळी 6 ते 9 मच्छी मार्केट व डेअरी दुकान, 2) सकाळी 9.30 ते 12 भाजीपाला दुकाने व किराणा मालाची दुकाने, 3) सायंकाळी 6 ते 8 किराणा माल दुकाने व डेअरी सुरु राहतील. परंतु एकाच ठिकाणी तीनपेक्षा जास्त लोक एकत्र जमणार नाहीत याची दक्षता दुकानदाराने घ्यावी. अन्यथा दुकानदार व इतर लोकांवर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी कळविले आहे.