Breaking News

रसायनी परिसरात मास्कचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

सम्यक सामाजिक संस्था, रसायनी आणि जनविकास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी पाताळगंगा परिसरात शेकडो मास्कचे वाटप करण्यात आले. शिवाय आजाराविषयी पत्रके वाटून जनजागृतीही करण्यात आली. एक सामाजिक बांधिलकी म्हणून सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड आणि जनविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ कुरंगले यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी परिसरातील मोहोपाडा कामगार नाका, मोहोपाडा मासळी बाजार, रिक्षा थांबे, बाजारपेठा, परिसरातील गावे येथे शेकडो मास्कचे वाटप करण्यात आले. रसायनी परिसरातील नाका कामगार हे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या कामगारांना कोरोना आजाराचे महत्त्व सांगून खबरदारी म्हणून मास्क लावण्यासंबंधी आवाहन सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड व जनविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ कुरंगले यांनी केले. तरी सर्वांनी कोरोना विषाणू रोखण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply