Breaking News

नावाची पाटी पनवेलमध्ये, तलाठी मात्र उरणमध्ये

पनवेल : प्रतिनिधी – कोरोनाचे संकट बिकट होत असताना पनवेल शहरात महसूल खात्यात चार तलाठ्यांचा कारभार पनवेलला एकाच तलाठ्याकडे असल्याचे दिसून येत आहे. पनवेल क्रमांक दोनचे तलाठी के. डी. मोहिते आपली नेमणूक उरणहून पनवेल येथे झाल्यावर आपल्या नावाची पाटी पनवेल कार्यालयात लावून पुन्हा उरण येथे कारभार करीत असल्याने आश्चर्य व्यक्त  करण्यात येत आहे.   

पनवेल शहर मोठे असल्याने त्याचा महसुली कारभार पहाण्यासाठी शहरात चार तलाठ्यांची पदे आहेत. पनवेल क्रमांक एक साठी तलाठी सुरेश राठोड यांची नेमणूक करण्यात आली आहे. पनवेल क्रमांक 2 साठी

उरणहुन नियमानुसार बदली होऊन आलेले तलाठी के. डी. मोहिते यांची नेमणूक करण्यात आली होती. पण त्यांनी आपली पाटी फक्त पनवेल कार्यालयात लावून वरिष्ठ अधिकार्‍यांना पटवून उरण येथेच राहणे पसंद केले. त्यांचा पगार ही पनवेलमधून निघत असल्याची माहिती मिळते. दोन पदे रिक्त असल्याने एकाच तलाठ्यांना पनवेल शहराचे काम सांभाळावे लागत आहे.

कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीत पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशातून आलेल्या व्यक्ती आहेत. त्यांची माहिती ठेवण्याचे काम महसूल विभागाकडे म्हणजेच पर्यायाने तलाठ्यांचे असते. त्यासाठी महसूल विभागाकडे सद्यस्थितीत एकच तलाठी काम करीत आहे. अशावेळी पनवेलमधून पगार घेणारे आणि पनवेलमध्येच रहाणारे तलाठी के. डी. मोहिते यांना उरणमध्ये पाठवण्यामागे काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply