नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढणार्या कोरोनाशी लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. भारताने कोविड-19शी लढाई सुरू केली असून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत देशातील सर्व वर्गातील लोकांनी आर्थिक योगदान देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे जनतेतून आलेल्या या आर्थिक मदतीचा उपयोग अडचणींवर मात करण्यासाठी होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आवाहन करताना म्हटले आहे. पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे हे आवाहन केले आहे. माझे देशातील जनतेला आवाहन आहे की, देशातील जनतेने पीएम-केअर्स फंडात आर्थिक योगदान द्यावे. या फंडाचा उपयोग पुढील काळातील अडचणीच्या काळावर मात करण्यासाठीही करता येणार आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे या फंडाबाबत तपशील सांगणारी एक लिंकदेखील शेअर केली आहे.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper