Breaking News

पनवेल तालुक्यात 24 तासांमध्ये नवीन रुग्ण नाही

पनवेल : प्रतिनिधी

येथील महापालिका क्षेत्रासह तालुक्यात बुधवारी (दि. 15) कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्हची संख्या 26 असून उलवे नोडमधील चार रुग्णांमुळे पनवेल तालुक्यात 30, तर उरणमधील दोन पॉझिटीव्हमुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 32 कायम आहे. दरम्यान, तपासणीसाठी पाठवलेल्या 354 पैकी 312 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 10 जणांचे  रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोविड 19चे चार रुग्ण बारे झाले, तर एकाचा मृत्यू झालेला आहे. खारघर येथील ग्रामविकास भवनातील केअर सेंटरमध्ये 17 जण, कोविड (उपजिल्हा) रुग्णालयात 24 आणि कामोठे एमजीएम रूग्णालयात 16 जण उपचार घेत आहेत, अशी माहिती प्रशासनाकडूनदेण्यात आली.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply