Breaking News

किल्ले स्पर्धेत राजे शिवराय प्रतिष्ठान प्रथम

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवीन पनवेलच्या राजे शिवराय प्रतिष्ठानने या वर्षीही प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण भाजप पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते हा पारितोषिक वितरण
सोहळा झाला.
या स्पर्धेमध्ये एकूण 55 किल्ले आयोजकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक राजे शिवराय प्रतिष्ठान, नवीन पनवेल यांनी मिळविला असून त्यांना 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांक यश पालकर ग्रुप, पनवेल (पारितोषिक सहा हजार रुपये), तृतीय क्रमांक वरद शिरसागर, पनवेल (पारितोषिक चार हजार रुपये) तर 10 जण उत्तेजनार्थ काढण्यात आले. त्यांना दोन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यासोबतच अन्य 10 जण उत्तेजनार्थ काढण्यात आले. त्यांना एक हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. सर्व सहभागी आयोजकांना सहभाग चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते
गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय बहिरा, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप, सरचिटणीस गौरव कांडपिळे, युवा नेता अभिषेक भोपी, कुलवीर चंडिक, विवेक होन, अक्षय सिंग, ओम करमलकर, नूतन पाटील, देवांशू प्रभाळे, शुभम कांबळे, अनिकेत भोईर, प्रणय पाटील, विशांत सापलेया, स्वराज पानरी, सुरज शिंदे, श्रवण घोसाळकर आदी
उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply