Breaking News

हल्ल्यापूर्वी कोविड धर्म, जात, पंथ पाहत नाही : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशभरातील कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 हल्ल्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जाती, पंथ, भाषा किंवा सीमा यापैकी काहीही पाहत नाही. त्यामुळे आपला प्रतिसाद आणि आचरण हे ऐक्य-बंधूता यांना प्राधान्य देणारे असायला हवे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ’लिंक्डइन’वरून एक लेख प्रसिद्ध केला आहे. कोरोना संकटानंतर जगाला एका नव्या बिझनेस मॉडलची गरज असल्याची जाणीव झालीय. तरुणांची अखंड ऊर्जा असणारा भारत कोविड-19 नंतर जगाला एक नवीन मॉडेल देईल, असे या लेखात पंतप्रधान मोदींनी म्हटलेय. भारत जगाला एक नवी कार्य संस्कृती देऊ शकतो कारण हाच देश आपल्या नवोन्मेषी विचारांप्रती उत्साहासाठी प्रसिद्ध आहे, असेही यात पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …

Leave a Reply