Breaking News

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल

कर्जत ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली असतानाही त्यांचे उल्लंघन करून कर्जतमधील एका सरकारी नोकराने बेकायदेशीररीत्या व धोकादायक पद्धतीने आंब्याच्या पेट्या घेऊन म्हसळा ते कर्जत
प्रवास केल्याचे आढळून आले. या प्रकरणी कर्जत पोलिसांकडून दोन लाखांचा माल व एक मारुती सुझुकी व्हॅन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून त्यामुळे अनेक नागरिक मुत्युमुखी पडत आहेत. तरीही कर्जत पोलीस ठाणे हद्दीत गणेश सोसायटी, नानामास्तर मुद्रे, येथे राहणारे अजय सोपानराव केंद्रे यांनी आपल्या गाडीतून म्हसळा येथून कर्जतमध्ये आंब्याच्या पेट्या आणून त्याची विक्री करीत होते. केंद्रे हे सरकारी नोकर असून त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी कोविड-19 कोरोनासंदर्भात दिलेले संचारबंदीचे आदेश माहीत
असूनही त्याची अवज्ञा करून बेकायदेशीररीत्या व धोकादायक पद्धतीने आंब्याच्या पेट्या घेऊन म्हसळा ते कर्जत असा प्रवास केल्याचे आढळून आले आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 92/2020 भां. दं. वि. कलम 188, 269प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार वैभव पाटील करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply