Breaking News

पंतप्रधान मोदींसह भाजपचे सर्व नेते बनले ‘चौकीदार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ‘मै भी चौकीदार’ या कॅम्पेनची सोशल मिडीयात सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ’चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ भाजपच्या अनेक मंत्र्यांनी, तसेच नेत्यांनी त्यांचे अनुकरण केले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मै भी चौकीदार असा प्रमुख उल्लेख करण्यात आला. राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या घोषणेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत म्हटले की, मी देशाची सेवा करण्यासाठी चौकीदार आहे, पण मी एकटा चौकीदार नाही; तर भ्रष्टाचाराविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. जो देशाची प्रगती करण्यासाठी मेहनत करतोय, तो चौकीदार आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार आहे असे म्हणत मै भी चौकीदार ही मोहीम ट्विटरवर सुरू केली आहे. त्यानंतर सर्वच भाजपजनांनी आपल्या नावापुढे ’चौकीदार’ असे विशेषण लावण्यास सुुरुवात केल्याचे दिसून येते. त्यामुळे हा ट्रेण्ड जोमात आहे.

-आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केला नावात बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण करीत सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आपल्या ट्विटर हँडलच्या नावात बदल केला आहे. चौकीदार प्रशांत ठाकूर असे त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव आता दिसून येतेे. विशेष म्हणजे, त्यास पसंती लाभत आहे. ट्विटरवर रविवारी दिवसभर हाच ट्रेण्ड होता.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply