Breaking News

ठाकरे सरकारची पुरगस्तांना तुटपुंजी मदत

व्यापार्‍यांसह भाजपचे सांगलीत आंदोलन

सांगली : प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर नुकसान भरपाईपोटी व्यापार्‍यांना जास्तीत जास्त 50 हजार रुपये किंवा एकूण नुकसानीच्या 75 टक्के मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र व्यापार्‍यांना 200 रुपये ते एक हजार 500 रुपयांचे धनादेश मिळाले आहेत. राज्य सरकारकडून मिळालेल्या या तुटपुंज्या मदतीमुळे व्यापारी संतापले असून याच मुद्द्यावरून सांगलीतील भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. मंगळवारी (दि. 19) भाजपने व्यापार्‍यांना सोबत घेऊन राज्य सरकारविरोधात निदर्शने केली.

’भीक नको, मदत द्या’ असा आक्रोश सांगलीतील व्यापार्‍यांकडून करण्यात आला. जुलै महिन्यात आलेल्या महापुराने सांगली शहरातील बहुतांश बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने व्यापारी उद्ध्वस्त झाले. कोरोनाच्या संकटामुळे आधीच व्यापार्‍यांचे अर्थकारण कोलमडून पडलेआहे. त्यातच महापुराचा फटका बसल्याने व्यापारी हवालदिल झाले होते.

व्यापार्‍यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येकी 50 हजार रुपये किंवा एकूण नुकसानीच्या 75 टक्के मदत देण्याचे जाहीर केले होते. जिल्हा प्रशासनाकडून सध्या मदतीचे धनादेश व्यापार्‍यांना मिळू लागले आहेत. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही केवळ दोनशे ते पंधराशे रुपयांचे धनादेश मिळत असल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत.

राज्य सरकारकडून पूरग्रस्त व्यापार्‍यांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात भाजप आक्रमक झाली असून सांगलीत भाजपच्या नेत्यांनी व्यापार्‍यांना सोबत घेऊन मंगळवारी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

भीक नको, पूरग्रस्तांना हक्काची मदत द्या, अशी मागणी यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांसह व्यापार्‍यांनी केली. 2019च्या महापुरानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या मदतीनुसार सध्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी व्यापार्यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतरही मदत मिळू शकली नाही, याबाबत खंत व्यक्त करण्यात आली. या वेळी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply