Breaking News

सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली : सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच सुरू होणार आहे, पण कडक नियमांसह ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि. 6) दिली. लॉकडाऊनमुळे देशातील अनेक भागांमध्ये नागरिक अडकून पडले आहे. या नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी विमान, रेल्वे आणि बस वाहतूक लवकरच सुरू केली जाईल, असे गडकरी म्हणाले. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचे लवकरच नियोजन केले जाईल. खासकरून बससेवा आणि कॅब सेवा सुरू करण्यावर लक्ष आहे, पण यासाठी काही नियम घालण्यात येतील, असे गडकरींनी स्पष्ट केले. त्यांनी बस आणि कार ऑपरेटर संघटनेच्या सदस्यांशी चर्चा केली. त्या वेळी ही माहिती दिली. कोरोनातून देश लवकरच बाहेर येईल. या संकटाचे रूप बदलून ते देशाला वरदानही ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply