कर्जत : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कर्जत तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नवनियुक्त पदाधिकार्यांचा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम गुरुवारी (दि. 11) झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या.
भाजप किसान मोर्चाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी शिरीष कदम, सरचिटणीसपदी भगवान डोंगरे, उपाध्यक्षपदी रमेश शेळके, रमेश आहीर, चिटणीसपदी ज्ञानेश्वर ऐनकर, प्रमोद बार्शि, खजिनदारपदी कैलास रघुनाथ पाटील, सदस्यपदी कमळू थोराड, शरद मुखे, भरत मालुसरे, जगन्नाथ पाटील, नथू कराळे, बापू भगत, कैलास मोतीराम पाटील, प्रदीप मते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकार्यांचा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम कर्जत तालुका मंडल अध्यक्ष यांच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या वेळी भाजपचे किसन मोर्चा जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, सरचिटणीस विनायक पवार, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, कर्जत तालुका मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर, उपाध्यक्ष सचिन म्हस्कर, सरचिटणीस राजेश भगत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, उमरोली जिल्हा परिषद अध्यक्ष केशव तरे, रवींद्र म्हसे, प्रकाश पेमारे, सुनील शेळके, यशवंत देसले, उमेश शेळके, सुदाम शेळके, उमेश राणे, धनंजय धुळे आदी उपस्थित होते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper