पनवेल : रामप्रहर वृत्त
व्ही.के सेव्हन्टी फाय (75) सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त पनवेल येथील सीकेपी हॉलमध्ये भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या भव्य दिव्य दिमाखदार प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या उद्घाटन समारंभासाठी सीकेपी हॉलचे कार्यकारी सदस्य राजू गुप्ते, यांच्यासह व्ही. के सेव्हन्टी फाय (75) सामाजिक मंडळाचे सर्व सदस्य, रंगदीप क्रिएशनचे सर्व कलाकार सदस्य आणि इतर नागरिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उद् म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना निमंत्रित करण्यामागे एक खास प्रयोजन होते. व्ही. के सेव्हन्टी फाय (75) सामाजिक मंडळाचे सदस्य हे सालच्या वी चे विठोबा खंडाप्पा हायस्कूलचे विद्यार्थी आहेत आणि त्यावेळी रामशेठ ठाकूर त्यांना शिक्षक म्हणून लाभले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी 25 वर्षांनी म्हणजेच 26 जानेवारी 2000 रोजी एकत्र येऊन हे मंडळ स्थापन केले. आज 2025 मध्ये मंडळाच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, तसेच सदस्यांच्या वी एसएससीला वर्षे पूर्ण होत आहेत. याशिवाय, 1975 साली शिक्षक म्हणून लाभलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. हा त्रिवेणी संगम साधून मंडळाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना या रांगोळी प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रमुख उद्घाटक म्हणून बोलावून त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्याचे ठरविले आणि तो उत्साहात पार पाडला.
रांगोळी प्रदर्शनाचे विषेश आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज, लोकनेते रामशेठ ठाकूर, दशावतार, वासुदेव बळवंत फडके, रतन टाटा, देव आनंद व अन्य रांगोळ्या आहेत. रंगदीप क्रिएशनमधील सर्व नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या पुढील उत्तम वाटचालीस मदत व्हावी या दृष्टिकोनातून व्ही.के सेव्हन्टी फाय (75) सामाजिक मंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या मंडळाने गेल्या 25 वर्षांमध्ये 52 आदिवासी जिल्हा परिषद तसेच वस्तीगृहातील दुर्मिळ शाळांमध्ये, जिथे कुठलीही सामाजिक संस्था पोहोचत नाही, अशा शाळांमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत केली आहे.
हे रांगोळी प्रदर्शन 18 ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आलेले आहे. कलाप्रेमी नागरिक आणि रसिकांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन व्ही.के सेव्हन्टी फाय 75) सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांनी केले आहे.
या रांगोळी प्रदर्शनात गणपती – दिशा पाटील, व्हि.के.75 सिम्बॉल- शरयु घरत, लोकनेते रामशेठ ठाकूर – मनोज भोपी, कलावंती – योगेश्री ढमाले, कानिफनाथ महाराज – नेहा धामणकर, वात्सल्य – नेहा घरत, वैजयंती माला – प्रकाश नवाळे, दशावतार – योगेश्री ढमाले, वासुदेव बळवंत फडके – दिलीप शिगवण, हनुमान चालीसा – किर्ती, योगेश्री, साईबाबा – डॉ. अमोल सलाग्रे, देवानंद – ज्ञानेश्वर कारेकर, रतन टाटा – डॉ. दिलीप शिगवण, शिवाजी महाराज – किर्ती घरत, कामधेनु – तन्वी भोपी, हनुमान – हिमांशु भोपी, राधा कृष्ण – रत्नेश घरत, कांतारा – कशिश तिखे, संस्कार भारती – शरयु घरत यांनी अशा रांगोळ्या काढल्या आहेत.
Check Also
‘स्वर संध्या’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध
पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper