दुर्बल घटकांना मिळणार महापौर निधीतून अर्थसहाय्य

पनवेल :प्रतिनिधी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय कारणांसाठी तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणांस्तव पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी केले आहे. महापौर सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना गंभीर आजारांसाठी (कोविड 19, हृदयरोग, मेंदू संबधित उपचार तसेच शस्त्रक्रिया, कॅन्सर संबधित शस्त्रक्रिया, ल्युकेमीया, थॅलेसीमीया, क्षयरोग, अवयव प्रत्यारोपण, डायलिसिस, बोनमॅरो) आर्थिक मदत करण्यात येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना, अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी दुखापत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांना आर्थिक मदत करण्यात येईल. या महापौर निधीचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील (वेबसाईटवरील) अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची सर्व माहिती याठिकाणी आहे. हा अर्ज आणि त्यासोबत लागणारी कागदपत्रे महापालिकेला रिर्पींशश्रलेीिेीरींळेपऽसारळश्र.लेा या ईमेलवरती पाठवावी. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी पालिकेच्या समितीद्वारे केली जाईल. त्यानंतर पात्र गरजूंना पुढीलप्रमाणे अर्थसहाय्य करण्यात येईल.

अंदाजित खर्च     अर्थसहाय्य

1 लाख        रु. 5,000/-

1 लाख ते 2 लाख      रु. 10,000/-

2 लाख ते 3 लाख      रु. 15.000/-

3 लाख ते 4 लाख      रु. 20.000/-

4 लाखांच्यावर         रु. 25.000/-

Check Also

Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?

Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …

Leave a Reply