Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोगप्रतिकारक औषधांचे कोविड योद्ध्यांना वाटप

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते आणि भाजपचे युवा नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 18) पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि सफाई कामगार या कोविड योद्ध्यांना अर्सेनिक अल्बम 30 आणि व्हिटॅमिन सी या रोगप्रतिकारकशक्ती वाढविणार्‍या औषधाचे वाटप करून आरोग्यदायी स्वरूपात साजरा करण्यात आला.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले असून, काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामोठे आणि खारघरमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, कारण या ठिकाणाहून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्यामार्फत या रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी परेश ठाकूर यांच्या हस्ते खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांच्यासह त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांसाठी अर्सेनिक अल्बम 30 आणि व्हिटॅमिन सीच्या गोळ्या दिल्या. अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिका सफाई कामगारांनाही त्याचे वाटप करण्यात आले.
खारघर सेक्टर 12  येथील शिवमंदिरात भाजपतर्फे चालवण्यात येणार्‍या मोदी भोजन कम्युनिटी किचन या ठिकाणी परेश ठाकूर यांच्या हस्ते बेरोजगार मजुरांना जेवण आणि मिठाईचे  वाटप करण्यात आले. या वेळी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, अ‍ॅड. नरेश ठाकूर, युवा नेते वासुदेव घरत, विनोद घरत, सचिन वास्कर, गीता चौधरी, सीमा खडसे, साधना पवार, मनीषा भोयर, प्रतीक्षा कदम, सचिन वास्कर, विशाल नाईक, नितेश पाटील, शुभ पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply