Breaking News

खोपटे संघ सह्याद्री चषकाचा मानकरी

उरण : रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील गोवठणे येथे सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेतर्फे 40 वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संतोष शांताराम वर्तक यांच्यातर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत सेव्हन स्टार खोपटे संघाने विजेतेपदाचा सह्याद्री चषक जिंकला.

होळीचे औचित्य साधून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत उरण पूर्व विभागातील गोवठणे, आवरे, पाले, पिरकोन, सारडे, पाणदिवे, कोप्रोली, खोपटे, चिरनेर असे एकूण आमंत्रित 12 संघ सहभागी झाले होते. विशेष म्हणजे सहभागी संघांना कोणतेही शुल्क नव्हते.

स्पर्धेत भोलेनाथ आवरे संघाने द्वितीय; तर एमसीसी पाणदिवे संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या संघांना रोख रक्कम व सह्याद्री चषक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह, तसेच उत्कृष्ट खेळाडू, सामनावीर, मालिकावीर यांना चषके देण्यात आली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply