म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी गावात एका मृत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. संबंधित व्यक्ती मुंबईतून येथे आली होती.
म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायती व म्हसळा शहरासह नगरपंचायत हद्दीतील गौळवाडी, दुर्गवाडी, चिराठी, सावर गौळवाडी, बौद्धवाडी या विविध वस्त्यांमध्ये किमान 1800 ते 2100 चाकरमानी मुंबईवरून आले आहेत. त्यामध्ये बोरीवली येथील हॉटस्पॉट वस्तीतून दुर्गवाडी गावात आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा 19 मे रोजी अचानक श्वसनाच्या त्रासाने मृत्यू झाला होता. आरोग्य व नगरपंचायत प्रशासनाने मृत्यूपश्चात स्वॅब घेऊन नवी मुंबईत तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मृत पावलेली व्यक्ती 16 मे रोजी बोरिवली येथून मुलगा, मुलगी व जावई यांच्यासमवेत म्हसळा तालुक्यात आली होती. यातील मुलगी व जावई त्यांच्या चिरगाव येथे गेले, तर संबंधित वृद्ध व्यक्ती व मुलगा रिक्षाने दुर्गवाडी येथे आले. तीन दिवसांनी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेहावर ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नगरपंचायत प्रशासनाने अंत्यसंस्कार केले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …