Breaking News

कामोठ्यातील सर्व क्षेत्र पुन्हा खुले

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने तत्कालीन आयुक्त गणेश देशमुखनी 8 मेपासून संपूर्ण कामोठे कंटेन्मेंट झोन जाहीर केले होते. नवीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी 26 मेच्या रात्रीपासून कामोठ्यातील सर्व क्षेत्र पुन्हा खुले करण्याचा आदेश दिला आहे. 

कामोठ्याचे क्षेत्रफळ 2.76 चौकिमी आणि लोकसंख्या 1.13 लाख आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाचे 40% रुग्ण एकट्या कामोठ्यातील असल्याने संसर्ग फैलावू नये यासाठी हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी जाहीर केला होता. यापूर्वी त्या त्या भागातील इमारती कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत असत. परंतु कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने तसा निर्णय घेण्यात येऊन या भागात बाहेरील लोकांना व येथील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. अपवाद फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवा, पोलीस अशी सेवा देणारे नोंद करून जाऊ शकत होते. नवीन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कामोठ्यातील नागरिकांना  जाणे-येणे करण्यास आणि जीवनावश्यक सुविधा पुरवण्यास अडचण येत असल्याने तेथील सर्व क्षेत्र पुन्हा खुले करण्याचे आदेश दिले. भविष्यात तेथे कोरोनाचा रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत कंटेन्मेंट म्हणून गणण्यात येईल. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, लॉकडाऊनपर्यंत घरात बसणे बंधनकारक असणार आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply