Breaking News

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त

बँकिंग उद्योगातील ए.आय,बी,ई.ए. शी संलग्न असलेली बहुसंख्य संघटना बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, मुंबईने लॉक डाउन बाधितांना अन्नदान देऊन मदतीचा मोठा हात दिला व ह्या आव्हानात्मक परिथितीत जीवाची बाजी लावून कोरोना योद्धा म्हणून अविरत कार्य करणार्‍या डॉक्टर्स, पोलीस, पत्रकार, पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता दूत यांचा संघटनेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी संघटनेचे संघटन सचिव, अरविंद मोरे, गुरुद्वारा नवीन पनवेलचे अध्यक्ष हरविंदर सिंग बुटर, बँकेचे मुख्य प्रबंधक दिनेश परमार, शाखा प्रबंधक प्रतिमा जाधव व सामाजिक कार्यकर्ते प्रदीपराव देशमुख, विश्वजीत मारवाह आदी उपस्थित होते.

संघटने तर्फे पत्रकार, पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, दत्तात्रय शिंदे, महेश अहिरे, स्वच्छता दूत, रवी पालसिंग बहोत, श्रीपाद नाईक, शिवाजी चिरकार, सतीश चिंडालीया, विद्युत महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी अतुल चव्हाण, राजेंद्र थोरात व गुरुद्वाराचे पदाधिकारी हरविंदरसिंग बुटर, बलविंदरसिंग सैनी, जगजितसिंग बुटर, गुरुदेवसिंग चावला, हैप्पी सिंग व अमरजित सिंग यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

संघटनेचे पदाधिकारी गोपीचंद पाटेकर, बाबू जाधव, दत्ता डावरे, मंगेश भालेराव व महाबँकेचे शाखा प्रबंधक, गीता वर्दम, शैलजा ठकेकर, विजयकुमार पाटील व कर्मचारी अभिषेक परब, स्वाती परब, कमलेश सराफ, वामनराव गायकवाड व सतीश पारधे आदी  उपस्थित होते. कार्यक्रमास यशस्वी करण्यास अस्मिता गुणे, स्वेता कारंजकर, नीलिमा खोपकर, अमोल पवार, शिवाजी दळवी, जया लक्ष्मी, मीनाक्षी भाकरे, कीर्तना, सानिका ताम्हाणे, चंद्रकांत जाधव, सीमा मराठे, नरेश यादव, सुनेत्रा परांजपे, अंकिता दुर्गे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply