पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करुन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पनवेल तालुक्यात शनिवारी
(दि. 27) कोरोनाचे 119 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. 88 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 27 रूग्ण बरे झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये 31 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. 17 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल खांदा कॉलनी अमाम सागर मधील 57 वर्षीय व्यक्ती, नवीन पनवेल क्लासिक स्टर्लिंगमधील 80 वर्षीय व्यक्ती आणि कामोठे साई श्रध्दा बिल्डिंगमधील 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कळंबोलीत 13 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 327 झाली आहे. कामोठेमध्ये 13 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 487 झाली आहे.
खारघरमध्ये 16 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 369 झाली आहे. नवीन पनवेल मध्ये 19 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 273 झाली आहे. पनवेलमध्ये 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 256 झाली आहे. तळोजामध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 75 झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 1787 रुग्ण झाले असून 1153 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.52 टक्के आहे. 564 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात नव्याने भर पडलेल्या रुग्णांमध्ये पाली देवद पाच, करंजाडे चार, उलवे चार, देवद तीन, वहाळ तीन, आदई, डेरवली, नेरे येथे प्रत्येकी दोन, कोळखे, विचुंबे, वावंजे, तरघर, कुडावे, कोळवाडी येथे प्रत्येकी एक असा समावेश आहे. तर आदई तीन, नेवाळी तीन, उसरली खुर्द, करंजाडे, सुकापूर, विचुंबे येथे प्रत्येकी दोन, चिखले, कोप्रोली, वलप येथे प्रत्येकी एक रुग्ण असे बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी आहे.
नवी मुंबईत मृतांची संख्या 200 पार; एकूण बाधित सहा हजारांवर
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत शनिवारी
(दि. 27) कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 201 झाली आहे. दिवसभरात 150 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 111 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवी मुंबईने सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर आजतागायत एकूण तीन हजार 405 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सद्यस्थितीत नवी मुंबईत दोन हजार 397 रुग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 14, नेरुळ 30, वाशी 7, तुर्भे 07, कोपरखैरणे 26, घणसोली 29, ऐरोली 32 व दिघा 5 असा समावेश आहे.
उरण तालुक्यात 15 नवे रुग्ण; नऊ जण बरे; एकाचा मृत्यू
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात शनिवारी (दि. 27) कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले असल्याने उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 251 झाली आहे. तर दिवसभरात नऊ रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 196 झाली आहे. तसेच शनिवारी तालुक्यात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 52 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवीनशेवा येथील 7 वर्षीय बालक व 13, 37, 62 वर्षीय महिला, जासई येथील 6, 29 व 50 वर्षीय पुरुष, चिर्ले येथील 38 व 63 वर्षीय महिला, सेक्टर 15 द्रोणागिरी उरण येथील 56 वर्षीय पुरुष, सिडको कॉलनी उरण येथील 54 वर्षीय पुरुष, बालई येथील 47 वर्षीय पुरुष, पाणदिवे येथील 42 वर्षीय पुरुष, दिघोडे येथील 49 वर्षीय पुरुष, विंधणे येथील 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
तसेच बरे झालेल्या रुग्णांमध्ये तालुक्यातील देऊळवाडी येथील 13 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, बोरी येथील 37 वर्षीय पुरुष, कोटनाका येथील 34 वर्षीय पुरुष, गोवठणे येथील 34 वर्षीय महिला व 51 वर्षीय पुरुष, पाणजे येथील 42 वर्षीय पुरुष, जासई येथील 35 वर्षीय पुरुष, तांडेलनगर (उरण) येथील 31 वर्षीय महिला यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गोवठणे येथील 45 वर्षीय पुरुष यांचा
मृत्यू झाला आहे.
वासांबे हद्दीत दोन नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर
मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनीतील वासांबे (मोहोपाडा) हद्दीत मागील आठवड्यापासून पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून शनिवार (दि. 27) दुपारपर्यंत दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण दहा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली असून परिसरातील नागरिकांनी स्वत:ची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
यामध्ये रिस बालाजी सोसायटी नजिकच्या 66 वर्षीय वृध्दाचे वाशिवलीत दुकान असणार्या एकाचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. तर गणेशनगरमध्ये 31 वर्षीय तरुणाचा नव्याने अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो डि. वाय. पाटील रुग्णालयात कामास असल्याचे समजते.
सध्या वासांबे हद्दीत गणेशनगरमध्ये तीन, नवीन पोसरी दोन, भटवाडी एक, रिस दोन, रिसवाडी एक, कांबे एक असे दहा कोरोना रुग्ण आहेत. वासांबे हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वासांबे हद्दीत कोरोनाबाधित परिसरात वासांबे ग्रामपंचायतीकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.