Breaking News

मोहोपाडा येथील जनता विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेत ग्राम सुधार मंडळ, मोहोपाडा संकलित जनता विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाचा शास्त्र शाखेचा विद्यार्थी शाहू सोळंकी याने 77.23 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला तर मानसा गुप्ता हिने 84  टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. शाळेचा शास्र शाखेचा निकाल 94.73 टक्के लागला तर वाणिज्य शाखेचा निकाल 89.66 टक्के लागला आहे. यावर्षी पहिल्या पाच क्रमांकामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यात शास्र शाखेतून प्रथम क्रमांक- शाहू सोळंकी 77.23 टक्के, द्वितीय क्रमांक-शिंदे कार्तिके 76.15 टक्के, तृतीय क्रमांक-घाग गौरी 66.25 टक्के, चतुर्थ क्रमांक-मुल्ला चिराग 63.07 टक्के, पाचवा क्रमांक-यादव अभिषेक 69.15 टक्के, वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक-मानसा गुप्ता 84 टक्के, द्वितीय क्रमांक-पूजा माळी 81.85 टक्के,  तृतीय क्रमांक-मुस्कान शेख 81.08 टक्के, चतुर्थ क्रमांक-पूजा बाईत 78.65 टक्के, पाचवा क्रमांक-अपर्णा झाला 76.92 टक्के गुण मिळवून सुयश संपादन केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.जी. पळणीटकर, कार्याध्यक्ष  सुदाम मुंढे, सचिव एस. यू. म्हसकर तसेच मुख्याध्यापक बि. एस. वारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विज्ञान, वाणिज्य शाखेत ‘उरण एज्युकेशन’ची सरशी

कला शाखेत दिघोडे कनिष्ठ महाविद्यालय अव्वल

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. एकूण 91.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान व वणिज्य शाखेमध्ये उरण मधून उरण एज्युकेशन सोसायटी इंग्रजी माध्यम शाळा व ज्युनिअर कॉलेजने सरशी मारली आहे. तर कला शाखेतून उरण तालुक्यातून स्व.रा.ना.ठाकूर कला उच्च माध्यमिक विद्यालय दिघोडे कॉलेज प्रथम आले आहे.

विजान शाखेत 650 गुणांपैकी गरिमा नरेश जोशी या विद्यर्थिनीने 605 गुण मिळवून 93.8 टक्के मिळवुन पहिला क्रमांक मिळविला आहे.सुशील सुभाष मोर्या या विद्यार्थ्यांने 578 गुण मिळवून  88.92 टक्के मिळवून दुसरा क्रमांक मिळविला आहे.तर प्रथमेश धनंजय कडवे या विद्यार्थ्याने 555 गुण मिळवून 85.38 टक्के गुण मिळविले आहेत. तर वाणिज्य शाखेमध्ये 650 गुणांपैकी प्रथम 590 गुण मिळवून 90.77 टक्के मिळविले आहेत. दुसरा क्रमांक प्रेक्षणा मनोज ठाकूर या विद्यार्थिनीने 586 गुण मिळवून 90.15 टक्के मिळविले आहेत. तर तिसरा क्रमांक स्नेहल महेंद्र चव्हाण याने 584 गुण मिळवून 89.85 टक्के मिळविले आहेत. तर कला शाखेतून गणेश हिरु बांगारी या विद्यार्थ्यांने 650 गुणांपैकी 480 गुण मिळवून 73.84 टक्केवर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर चिरनेर येथील काळूशेठ धाकू खारपाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षाली विनोद केणी या विद्यार्थिनीने 475 गुण मिळवून 73.07 टक्के मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर स्व. रा.ना.ठाकूर कला उच्च माध्यमिक विद्यालय दिघोडे या शाळेचा सर्वेश वासुदेव पाटील या विध्यार्थाने 466 गुण मिळवून 71.69 टक्के गुण मिळविले असून तिसरा क्रमांक पटकाविला असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी दिपाली परब यांनी दिली असून, या सर्व गुणवत्त्व विद्यार्थ्यांचे तालुक्यातुन सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply