Breaking News

‘सरकारमध्ये काँग्रेसला विचारतोय कोण?’

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणी विचारात तरी घेत का, असा सवाल भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक, विनय कोरे, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर या नेत्यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी आमच्या संपर्कात भाजपचे काही आमदार असल्याची बातमी बाहेर आल्यानंतर फडणवीसांना दिल्लीला जावे लागले, असे म्हटले होते. त्यावर भाजपने पलटवार केला आहे.
भाजप नेते हर्षवधन पाटील म्हणाले की, राज्य सरकारने सध्या कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करावे. ते काम करण्याऐवजी नको ते मुद्दे उकरून काढले जात आहेत. प्रशासन कुठे आहे तेच दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply