मंगळुरू : वृत्तसंस्था
जगभरात कोरोना व्हायरसने कहर माजवला आहे. विविध देशांतील वैज्ञानिक कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत असून, कोरोनावरील लस येण्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच कर्नाटकातील उल्लाल नगर परिषदेतील काँग्रेस नगरसेवकाने कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी रम, काळीमिरी आणि अंड्यांचे सेवन करण्याचा अजब उपाय सुचविला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कर्नाटकच्या मंगळुरू येथील काँग्रेस नगरसेवक रविचंद्र गट्टी यांनी रम, काळीमिरी आणि अंड्याद्वारे कोरोनापासून कशा प्रकारे बचाव करू शकतो ते सांगितले आहे. त्यांनी व्हिडीओ काढून ही माहिती दिली. या व्हायरल व्हिडीओत काँग्रेस नेते गट्टी सांगतात की, तुम्ही फक्त एक चमचा काळीमिरीची पूड 90 मिली रममध्ये टाका, त्याला आपल्या हाताने चांगल्या रीतीने हलवून घ्या व त्यानंतर ते पिऊन टाका. कोरोना पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी त्याच्यासोबत उकडलेले अंडे खा, असेही ते म्हणाले.
काँग्रेस नेते रविचंद्र गट्टी इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे सांगितले की, मी अनेक औषधे घेतली, पण घरगुती उपायच कामी आला. मी एक राजकीय नेता म्हणून नव्हे, तर कोरोना समितीचा सदस्य या नात्याने तुम्हाला हा पर्याय सुचवत आहे. गट्टी यांचा हा एक मिनिटाचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे, ज्यात ते रमची बॉटलही पकडून दाखवत आहेत.
Check Also
अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….
काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …
RamPrahar – The Panvel Daily Paper