Breaking News

रायगडातील लॉकडाऊन हटवला

दोन दिवस आधीच जिल्हा अनलॉक

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दोन दिवस आधीच हटवला आहे. असे असले तरी संपूर्ण राज्यात लागू असलेले ‘मिशन बिगीन अगेन-2’चे नियम 31 जुलैपर्यंत लागू राहाणार आहेत.  
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 15 ते 26 जुलै या कालावधीत रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात लॉकडाऊन जाहीर केला होता, परंतु दोन दिवस आधीच शुक्रवारी (दि. 24) रात्री उशिरा  हा लॉकडाऊन उठविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना तसेच व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यात 15 ते 24 जुलै असा 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता, पण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश काढून लॉकडाऊन दोन दिवस वाढवून 15 ते 26 जुलै असा केला होता. लॉकडाऊनमुळे जनतेत नाराजी होती. ही नाराजी लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी 19 जुलै रोजी लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केला. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यात दोन वेळा शिथिलता दिली गेली. आता ही टाळेबंदी पूर्णपणे उठविण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply