Breaking News

म्हसळ्यातील कंपनीत 37 कामगार कोरोना पॉझिटिव्ह

परिसरातील ग्रामस्थ धास्तावले

म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी, रोहिणी या गावांना लागून असलेल्या दास ऑफशोर इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीतील तब्बल 37 कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कंपनीसह परिसरातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दास ऑफशोर कंपनीतील एकाला 15 जुलै रोजी अत्यवस्थ अवस्थेत पनवेल येथे पुढील उपचारांसाठी नेण्यात आले होते. तेथे या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर कंपनीने आपल्या सर्व कार्यालयीन कर्मचारी व कामगार अशी एकूण 67 जणांची कोरोना चाचणी करुन घेतली.
या चाचण्यांचे अहवाल शनिवारी (दि. 25) प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 37 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दास ऑफशोर कंपनीच्या अगदी लगतच तुरुंबाडी, रोहिणी ही मोठी लोकसंख्या असलेली गावे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर दास ऑफशोर कंपनीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने या गावांतील गावकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
म्हसळा तालुक्यात यापूर्वी एकाच दिवसात 22 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर आता तालुक्यातील एकमेव कंपनी असलेल्या दास ऑफशोरमध्ये एकाच दिवशी 37 कोरोनाचे रुग्ण समोर आल्याने तालुका आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे राहिले आहे.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply