Breaking News

भीमाशंकर रस्त्यासाठी संघर्ष समिती सरसावली!; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना घालणार साकडे

कर्जत : बातमीदार

चाकण भागातील परिसर मुंबईला जवळ करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा पनवेल-कशेळे-भीमाशंकर या प्रस्तावित राज्य मार्गाचे काम जलदगतीने व्हावे, या मागणीसाठी भीमाशंकर घाटरोड संघर्ष समिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहे. पनवेल-नेरे-कोठिंबे-वांद्रे-भीमाशंकर-मंचर असा नवीन राज्यमार्ग प्रास्तवित आहे. मात्र त्याचे काम धीम्यागतीने सुरू आहे. या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन त्याचे काम जलदगतीने करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, पनवेल-कशेळे-भीमाशंकर या रस्त्यासाठी पाठपुरावा करणार्‍या भीमाशंकर घाटरस्ता संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांच्या कर्जत येथील कार्यालयात झाली. त्या वेळी या नवीन मार्गाच्या पूर्णत्वासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी पुणे जिल्ह्यातील वांद्रे, मंचर भागातील संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply