Breaking News

भीमाशंकर अभयारण्य परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर

कर्जत : बातमीदार
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने भीमाशंकर अभयारण्याचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर केला आहे. या संदर्भात 2019मध्ये जाहीर केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
भीमाशंकर अभयारण्य हे रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात 130 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. या अभयारण्याबरोबरच आजूबाजूला असलेला 10 किलोमीटर हद्दीचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन बनविण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली होती. त्यानंतर 25 जुलै 2019 रोजी त्याचा प्रारूप आराखडा जाहीर करणारी अधिसूचना केंद्र सरकारकडून काढण्यात आली होती. त्याला मान्यता देण्यात आली आहे.
रायगडातील तिसरे क्षेत्र
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील भागाचा मिळून 2001मध्ये माथेरान इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर झाला होता. त्यानंतर 2013मध्ये अलिबाग, रोहा आणि मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्य परिसर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला. आता भीमाशंकर अभयारण्याचा परिसर या झोनमध्ये आला आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply