Breaking News

भारतीय रेल्वे कात टाकणार! संपूर्ण गाडी एसी करण्याची योजना

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय रेल्वेमध्ये आजवर वेळोवेळी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा रेल्वे कात टाकणार असून, एक महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार आता कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे एसी करण्याची योजना आखली आहे. रेल्वेच्या नव्या योजनेनुसार स्लीपर कोच आणि बिगर आरक्षित श्रेणीच्या डब्यांना एसी कोचमध्ये बदलण्यात येणार आहे. याद्वारे रेल्वे देशभरात एसी गाड्या आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रवाशांना खिशावरील अतिरिक्त भाराशिवाय चांगला आणि आरामदायी प्रवास उपलब्ध होऊ शकतो. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार अपग्रेड करण्यात आलेल्या स्लीपर कोचला इकॉनॉमिकल एसी 3-टायर संबोधले जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार कापूरथला येथील रेल्वे कोच तयार करणार्‍या फॅक्टरीकडे स्लीपर कोचला एसी कोचमध्ये रूपांतरित करण्याचा नमुना तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जनरल डब्यांची आसन क्षमताही वाढणार

बिगर आरक्षित जनरल क्लासच्या डब्यांनादेखील 100 सीटच्या एसी डब्यांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. यासाठीच्या डिझाइनला अंतिम स्वरूप दिले जात आहे. या प्रकल्पावर काम करणार्‍या एका अधिकार्‍याने सांगितले की, सुरुवातीच्या डिझाइनमध्ये प्रत्येक जनरल डब्यात 105 आसनांसाठी जागा बनवली जात आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply