Breaking News

खासदार श्रीरंग बारणे यांचा उद्या पनवेलमध्ये जाहीर सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुका भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचा जाहीर सत्कार शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या समारंभात राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार केला जाणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, सल्लागार बबन पाटील, रिपाइं कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड, समन्वयक अनिल चव्हाण, शशांक कामत, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, संघटक प्रथमेश सोमण आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.

या सभारंभास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुकाप्रमुख परेश पाटील, शहर प्रमुख अच्युत मनोरे व महायुतीच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यातआले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply