Sunday , October 1 2023
Breaking News

सानियाने पाच महिन्यांत केले 22 किलो वजन कमी

मुंबई : प्रतिनिधी

तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य नागरिक, वजन कमी करणे ही एका रात्रीमध्ये होण्यासारखी गोष्ट अजिबात नाही. यासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल, तर याबाबतीत टेनिसस्टार सानिया मिर्झाकडून टीप्स घेऊ शकता. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या महितीनुसार, सानियाने गरोदरपणानंतर केवळ पाच महिन्यांमध्येच 22 किलो वजन कमी केले आहे.

गरोदरपणात सानियाचे वजन फार वाढले होते आणि हे वजन कमी करणे तिच्यासाठी आव्हान होते, परंतु बाळंतपणानंतर पाच महिन्यांमध्येच तिने वजन कमी करण्यात यश मिळविले. गरोदरपणात सानियाचे वजन 89 किलो होते. बाळंतपणानंतर 15 दिवसांनी तिने व्यायाम करण्यास सुरुवात केली. यामुळे सानिया सर्व मातांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. ती आपल्या वर्कआऊटचे हॅशटॅगसह पोस्ट करते. याबाबत तिने सांगितले की, ‘यामागील कारण म्हणजे, आई झाल्यावरही तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. हा संदेश मला इतर महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे.’

सानियाने गरोदरपणामध्येही स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रीनेटल योगचा आधार घेतला आणि वर्कआऊटही सुरू ठेवलं. सानिया आपल्या वाढलेल्या वजनाने खूश नव्हती. एका मुलाखतीमध्ये तिने म्हटले होते की, ‘मी टेनिस खेळत असो किंवा नसो, परंतु जेव्हा मी स्वतःला आरशात पाहते त्या वेळी मी

पहिल्यासारखी अजिबात वाटत नाही.’ सानिया खाण्याची शौकीन आहे, मात्र बाळंतपणानंतर तिने आपल्या डाएटचे अगदी काटेकोरपणे पालन केले.

Check Also

शूटिंगबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर स्कूलचे यश

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक …

Leave a Reply