Breaking News

पोदी क्रमांक 2 व 3 मधील शौचालयांचे काम पूर्ण

माजी उपमहापौर चारुशीला घरत यांचे यशस्वी प्रयत्न

पनवेल ः वार्ताहर

पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल येथील पोदी क्रमांक 3, सेकटर 15  व 2 नंबर पोदी येथील सार्वजनिक शौचालय गेले कित्येक महिने दुरवस्थेत होते. यामुळे परिसरातील नागरिक व रस्त्याने ये-जा करणारे ग्रामस्थ दुर्गंधीने त्रस्त झाले होते. परिसरात लहान मुलेदेखील खेळत असल्याने नागरिकांचे व विशेषतः लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले होते. येथे साचणार्‍या सांडपाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत होते. स्थानिक लोकांनी याबाबत अनेकदा तक्रार केली, मात्र परिस्थिती जैसे थे होती. अखेर येथील नागरिकांनी याबाबत पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत व क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या महिला अध्यक्षा रूपाली शिंदे यांना कळविले असता त्यांनी तत्काळ पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून ड्रेनेजचे काम पूर्ण करून घेतले. स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना फक्त नौटंकीसाठी फोटो काढणारे मात्र येथील नागरिकांच्या मदतीला धावले नाहीत, पण चारुशीला घरत या आजही आपले घर, आपला परिसर स्वच्छ तर आपला देश स्वच्छ, या उक्तीप्रमाणे कोणतेही राजकारण न करता येथील नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी नेहमीच धावत असल्याचे परिसरातील नागरिकांनी या वेळी सांगितले. नागरिकांना होणार ड्रेनेजचा त्रास तत्काळ दूर केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी चारुशीला घरत व रूपाली शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply