माणगाव ः प्रतिनिधी
अखिल भारतीय विमुक्त एवंम धुमंतू जनजाती वेल्फेअर संघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी माणगाव येथील भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष दीपाली जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून तशा आशयाचे नियुक्तीपत्र संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष रंजनाताई पाराशिवे यांनी दीपाली जाधव यांना देऊन त्यांचे अभिनंदन केले.
दीपाली जाधव यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी करीत असलेल्या कार्यावर विश्वास दाखवून ही नियुक्ती करण्यात आली. दीपाली जाधव बेलदार भटका नियुक्त समाजाच्या महिला कार्यकर्त्या असून समाजावर होणार्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी सतत पुढे असतात. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.